
वैभववाडी : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यालयात २३ जूनला रोजी ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहरातील एकल महिला (विधवा, निराधार) यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, या कार्यक्रमात एकल महिलांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच राज्याच्या प्रस्तावित ‘एकल महिला धोरणा’साठी महिलांकडून अभिप्राय संकलित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, लाभ मिळविण्याची प्रक्रिया तसेच आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
वैभववाडी शहरातील सर्व एकल महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.










