
दोडामार्ग : दोडामार्ग तालुकास्तरीय बाल, कला, क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सव १६ व १७ डिसेंबर ला मोठ्या उत्साहात पार पडला. या दोन दिवसीय स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत उस्फुर्त सहभाग नोंदविला.
या स्पर्धेसाठी लागणारी चषके, मेडल तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या एक दिवसाच्या भोजनाची व्यवस्था कै. कृष्णा बाबली मोरजकर (निवृत्त शिक्षक), कुडासे यांच्या स्मरणार् सतीश कृष्णा मोरजकर यांच्या वतीने करण्यात आली. त्याचप्रमाणे शंकर आत्माराम हळदणकर (लाकूड व्यापारी, बोडदे) यांच्या वतीने एका दिवसाच्या सकाळच्या अल्पोपहाराची सोय करण्यात आली.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र वसंत देसाई यांच्या वतीने सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी दुपारच्या जेवणासाठी पुलावाची व्यवस्था करण्यात आली. तसेच महेश कृष्णा नाईक यांच्या सहकार्याने थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या संपूर्ण आयोजनासाठी राकेश करपे, अरुण पवार, रामचंद्र घाडी व आनंद कोळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेवण तयार करण्यासाठी कुडासे-भरपाल महिला बचत गटाच्या आश्विनी राऊत, अनिता देसाई, सुनिता देसाई, राजश्री राऊत, सोनिया देसाई व गीता देसाई यांनी विशेष योगदान दिले.
स्पर्धा यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मा. गटशिक्षणाधिकारी एन. एम. नदाफ साहेब व गटसमन्वयक सूर्यकांत नाईक सर यांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.










