LIVE UPDATES

SBI Clerk Recruitment 2026 : स्टेट बँक ऑफ इंडियात १,५३८ पदांसाठी भरती, असा करा अर्ज

SBI Clerk 1538 posts : स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवार अपात्र आढळल्यास त्यांचे अर्ज रद्द केले जाऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट पदांच्या निवड प्रक्रियेत प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, भाषा चाचणी आणि कागदपत्र पडताळणी अशा विविध टप्प्यांचा समावेश आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 16:24 PM
views 95  views

मुंबई : तुम्ही जर बॅंकेत नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 'ज्युनियर असोसिएट' पदांच्या १,५३८ बॅकलॉग रिक्त जागांसाठी पदभरतीची जाहिरात जारी केली आहे. ७ ऑगस्ट २०२६ पासून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट २०२६ आहे. या तारखेनंतर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. उमेदवार अपात्र आढळल्यास त्यांचे अर्ज रद्द केले जाऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट पदांच्या निवड प्रक्रियेत प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, भाषा चाचणी आणि कागदपत्र पडताळणी अशा विविध टप्प्यांचा समावेश आहे. या रिक्त जागा विशेषतः एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  

स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अर्जाचे शुल्क प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधील १,५३८ ज्युनियर असोसिएट पदांसाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स नुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

असा करा 'अर्ज'

सर्वप्रथम, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर होम पेजवर जाऊन करिअर्स' (Careers) या सेक्शनवर क्लिक करा. करंट ओपनिंग्स (Current Openings) वर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर "RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES SPECIAL RECRUITMENT DRIVE FOR SC/ST/OBC BACKLOG VACANCIES" हा पर्याय दिसेल. अप्लाय नाऊ (Apply Now) वर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. अर्जाचे शुल्क भरा. ऑनलाइन अर्जात भरलेली माहिती तपासा. सबमिट वर क्लिक करा. संदर्भासाठी ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट जवळ ठेवा.