
सावंतवाडी : जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा मंगळवार २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत टोपिवाला मेमोरियल टेक्निकल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे होणार आहे.
या मेळाव्यात विविध उद्योग व आस्थापनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, रोजगार इच्छुक युवक-युवतींना उपलब्ध रोजगाराच्या संधी, पात्रता व भरती प्रक्रियेबाबत माहिती मिळणार आहे. पात्र उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
टोपिवाला मेमोरियल टेक्निकल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असून रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










