
वैभववाडी : तरुणीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी खांबाळे मोहीतेवाडी येथील शुभम प्रमोद कदम, वय १९ यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधात एका तरूणीने काल (ता.९)सायकांळी उशिरा तक्रार दिली होती. या प्रकरणी त्या तरुणाला पोलीसांनी नोटीस बजावली आहे.
एका गावातील तरुणी शहरात एका दुकानात कामासाठी येते. सोमवारी ७ सायकांळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती कामावरून बसने घरी परतत होती. ती एसटी बस थांब्यावर उतरल्यानंतर तेथून पायी घरी निघालेली असताना संशयित आरोपी शुभम कदम याने तिला वाटेत अडवले आणि मारहाण केली. याशिवाय तिचा विनयभंग केला. त्यानतंर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती तरुणी बसस्टॉपवर आली असताना पुन्हा तिला मारहाण करण्यात आली. अशी तक्रार तरूणीने पोलीसांत काल (ता.९)सायकांळी उशिरा दिली. त्यानंतर पोलीसांनी त्यांच्याविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधवी अडुळकर करीत आहेत.