
सावंतवाडी : शहरात बांदा नाका येथे आपसातील वादावरून युवतीच्या डोक्यात वार केल्याची घटना घडली. आज रात्री हा प्रकार घडला. भावांचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवतीच्या डोक्यावर वार झाला. हे कुटुंब इस्लामपूर येथील असून माघारी जाताना त्यांचा सावंतवाडीत वाद झाला. यातून हा प्रकार घडला.
यात त्या युवतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून गोवा येथून पुन्हा माघारी फिरत असताना हा प्रकार घडला. दोघांच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवतीला यात इजा झाली. यानंतर तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस घटनास्थळी उपस्थित असून पुढील सोपस्कार पार पाडत आहेत. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी संबंधितांना मदत केली.













