
कणकवली : शहरातील कणकवली - आचरा रस्त्यावरील मारुती आळी येथील मारुती मंदिराशेजारील आचरेकर बिल्डिंगच्या पार्किंग जागेत उभी केलेली टीव्हीएस कंपनीची ज्युपिटर दुचाकी चोरीस गेली. ही घटना २० नोव्हेंबरला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दुचाकी मालक संदीप नामदेव राऊत (४२, रा. आशीये - समर्थनगर) यांनी दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकी न सापडल्याने अखेर संदीप यांनी कणकवली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.














