
सावंतवाडी : सिंधुदुर्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत बांदा आणि कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन अट्टल आरोपींना गोव्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे.
बांदा पोलीस ठाणे गु.र.नं. 149/2025, भा.न्या.सं. (BNS) कलम 62, 305 (अ), 331(3)(4) कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 348/2025, भा.न्या.सं. (BNS) कलम 305, 334(1) कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीत धीरज दिलीपकुमार गुप्ता, वय 20 वर्षे, रा. रूम नं 110, घोटणी चाळ, खरासवाडा, बारदेश म्हापसा, गोवा, विधी संघर्षग्रस्त बालक, वय 17 वर्षे, मूळ रा. चौकुळ, खासकीलवाडा, ता. सावंतवाडी, सद्या रा. धुळेर, व्हिजन हॉस्पीटल समोर, म्हापसा, बारदेश, गोवा. यांना ताब्यात घेतले. आरोपींना बार्देश म्हापसा आणि खारसवाडा परिसरातून मोठ्या कौशल्याने ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना बांदा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण कारवाई मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, आणि नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार, तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग येथील अधिकारी व अंमलदारांचा पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार राणे, पोलीस हवालदार डॉमनिक डिसोझा, पोलीस हवालदार राजेंद्र गोसावी, पोलीस हवालदार आशिष जामदार,
पोलीस हवालदार जॅक्सन घोंसालविस यांचा समावेश होता. सिंधुदुर्ग पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून, नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.