मटका गोडाऊन कारवाईतील हे आहेत 12 आरोपी

2 लाख 78 हजार 725 रुपयांची रोकड जप्त
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 21, 2025 19:05 PM
views 1314  views

कणकवली : कणकवली बाजारपेठेतील मटका व्यवसायिक महादेव घेवारे याच्या गोदामावर दस्तुरखुद्द पालकमंत्री नीतेश राणे यांनी धाड टाकल्यानंतर कणकवली तालुक्यासह जिल्हाभरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर २ लाख ७८ हजार ७२५ रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुन्हा दाखल के लेले आरोपी पुढीलप्रमाणे : 

महादेव रामकांत घेवारी (६५, रा. कणकवली - बाजारपेठ), रवींद्र श्रीपत चव्हाण (४४, रा. कणकवली - टेंबवाडी ), मयुर मनोहर पांडव (३० रा. जानवली - वाकाडवाडी ), संदीप शंकर पडवळ (४६, रा. कणकवली,  - कनकनगर, ) चंद्रकांत शंकर गवाणकर ( 57, कणकवली - परबवाडी) , प्रशांत शशिकांत घाडीगावकर (४6, रा. वरवडे), महेश आत्माराम बाणे (२७ रा. कणकवली, - मधलीवाडी ) , अनिल श्रीपत पाष्टे ( 48 , कलमठ - लांजेवाडी ) , सतीश विष्णू गावडे ( 40 , वागदे - गावठणवाडी ) , संतोष शंकर राठोड ( 43, कलमठ - गावडेवाडी ) तुषार यशवंत जाधव ( 42, वागदे - सावरवाडी ) , महेंद्र चंद्रकांत देवणे ( 35, कणकवली - बाजारपेठ).

दरम्यान सदर आरोपींवर नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल होतो, कोणती कलमे लावली जाणार याबाबात पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सध्या विचार विनिमय सुरु आहे.