
दोडामार्ग : साटेली परिसरात शेतजमिनीवरील लोखंडी पोल आणि वायरची चोरी झाल्याची घटना समोर आली असून याबाबत मालकाने दोडामार्ग पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, साटेली येथील सर्वे नं. १११/१/अ क्षेत्र ६.७४.२५ पो.ख. १.२३.७५ आकार २.०७ हि जमीन प्रीतम कुमार (रा. चिकालीम, वास्को-गोवा) यांच्या मालकीची आहे. या जमिनीला लोखंडी कंपाऊंड केलेले होते. ४ डिसेंबर रोजी सकाळी तेथे गेल्यावर कंपाऊंडचे लोखंडी पोल आणि वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अंदाजे १५ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ही चोरी रात्रीच्या सुमारास झाल्याचा संशय असून दोडामार्ग पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.












