
सावंतवाडी : आंबोली कामतवाडी येथील एका स्कूलचे उप प्राचार्य रवी पाटील यांच्या घरी चोरी झाली. यात साधारण 30 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले असून आंबोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
आंबोली कामतवाडी येथे रवींद्र पाटील यांचे घर आहे. ते एका स्कूलमध्ये उप प्राचार्य आहेत. गणेश चतुर्थीच्या सुट्टीत २३ तारीखला ते कोल्हापूर येथे गावी गेले होते. काल ते आंबोली येथे आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजताच त्यांनी आंबोली पोलिसात तक्रार दिली. आज येथील हवालदार संतोष गणोले, लक्ष्मण काळे, गौरव परब,मनीष शिंदे,रामदास जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ,डॉग स्कॉड यांनीही याठिकाणी तपासणी केली असून पुढील तपास सुरु आहे. या चोरीमध्ये अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र,चांदीच्या दोन देवाच्या मूर्ती, लहान मुलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, 2500 रुपये असा ऐवज चोरी झाला आहे.