
कणकवली : मानेनजीकच्या गाठीवरील शस्त्रक्रियेनंतर पुढे कोल्हापूर येथील रुग्णालयात कस्तुरी पाताडे या कासार्डे येथील 19 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याबाबत रविवारी रात्री उशिरा शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली.
कस्तुरी हिच्या शरीरातील काही नमुने कोल्हापूर व रत्नागिरी येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल 15 ते 20 दिवसात प्राप्त होईल त्यानंतरच कस्तुरी हिच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी दिली आहे. शिवविच्छेदन प्रक्रिया करताना पाच डॉक्टरांचा समावेश होता. सायंकाळी पाच वाजता सुमारास सुरू झालेली शुभविच्छेदन प्रक्रिया रात्री नऊ वाजता संपली, असेही डॉ. रेड्डी यांनी सांगितले.














