
वैभववाडी : उंबर्डे भुतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण वय २५या तरुणीचा आज सायंकाळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यू नंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा हा मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप आहे.
उपचार करण्यास हलगर्जीपणा करण्या-या डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत तरुणीच्या नातेवाईकांनी घेतला आहे.या घटनेनंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.














