गुरे वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पोलीस - बजरंग दलाची कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 07, 2025 19:42 PM
views 73  views

वैभववाडी : भुईबावडा घाटमार्गे गुरे वाहतुक करणारा टेम्पो पेालीस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी पकडला. या टेम्पो मध्ये वीस हजार रुपये किंमतीचे दोन बैल सापडले. या प्रकरणी पोलीसांनी टेम्पोसह दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (ता.६)रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सावंतवाडी येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते शुभम प्रकाश हिर्लेकर  यांनी भुईबावडा घाटातून गुरांची वाहतूक होणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून भुईबावडा रिंगेवाडी येथे गुरे वाहतूक करणारा टेम्पो पकडला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, पोलीस हवालदार गणेश भोवड, पोलीस कर्मचारी रघुनाथ जांभळे, रणजित दबडे, चालक जे.जे फर्नाडीस, बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री.हिर्लेकर ,हितेंद्र सिताराम कदम (एडगाव)तेजस रवींद्र भाबुंरे (तळेरे) यांनी केली. याप्रकरणी टेम्पो चालक सागर अशोक थोरवत (वय-४२)रा.कासारवाडा ता.राधानगरी)त्याचा सहकारी राहुल सिताराम पाटील रा.कडवे ता.गगनबावडा या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर बेकायदेशीरपणे गुरे वाहतुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी दोनही बैल गायवासरू गोशाळेत देखभालीकरीता पाठवले आहेत. आठ दिवसांत पोलीसांनी ही दुसरी कारवाई केली आहे.