खंडणीप्रकरणी संशयतांना जामीन मंजूर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: November 19, 2025 15:07 PM
views 152  views

कुडाळ : सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तडीपारी हटवण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशयित  किशोर वरक व सुरेश झोरे या दोघांना कुडाळ येथील न्यायालयाने ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता दिली आहे.

सदर दोघांवर बिडवलकर खून प्रकरणातील तडीपारी रद्द करण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, बिडवलकर खून प्रकरणातील आरोपी सिद्धेश शिरसाट याला तुरुंगवास झाल्यानंतर, रागातून त्यानेच खोटी तक्रार दिली असावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अशपाक शेख व पंकज खरवडेकर यांनी न्यायालयासमोर मांडला. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत दोन्ही संशयितांना जामिनावर मुक्तता  केली. या पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम अधिक तपास करत आहे.