
कणकवली : श्रीनिवास रेड्डी (५३, रा. बेंगलोर - कर्नाटक) यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या त्या तीनही आरोपींना मंगळवारी मध्यरात्रीनंतर कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुभाष सुब्बारायप्पा यस (३२), नरसिंम्हा नारायण स्वामी मूर्ती (३६), मधुसूदन सिद्धप्पा तोकला (५२, सर्व रा. बेंगलोर - कर्नाटक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना आज बुधवारी दुपारी ३ वा. सुमारास कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान एलसीबी व कणकवली पोलिसांचे पथक अद्यापही बेंगलोर येथे ठाण मांडून असून आणखी काही संशयितांना लवकरच अटक होईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.














