ओटवणे गवळीवाडी येथील तरुणाची आत्महत्या

Edited by: विनायक गांवस
Published on: November 08, 2025 20:17 PM
views 37  views

सावंतवाडी : ओटवणे गवळीवाडी येथील नागेश विश्राम शृंगारे (वय 45) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आला. बायको आजारपणामुळे आपल्या माहेरी राहत असल्याने आणि मुलगा आतेकडे राहत असल्याने सध्या ते एकटेच घरी राहात. दारूचे व्यसन असल्याने तसेच गेली काही वर्षे त्याचे मानसिक संतुलन बिघडलेल. नशेत दरवाजा बंद करून ते आत रहायचे. मात्र, आज दरवाजा उघडला असता गळफास घेतल्या स्थितीत ते आढळले. त्यांच्या पश्चात काका, काकी, बायको, मुलगा असा परिवार आहे.