
कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरून जात असलेल्या ट्रेनची धडक बसून अनिल गिरिधर यादव (५९, रा. कणकवली - कनकनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उत्तररात्री १.१० वा. सुमारास उघडकीस आली.
अनिल हे रेल्वे ट्रॅकवर का गेले होते, याचे कारण समजू शकलेले नाही. त्यांना कोणत्या ट्रेनची धडक बसली, हे देखील समजू शकलेले नाही. घटनेची खबर रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) कॉन्स्टेबल हृदयनाथ शिंदे यांनी दिली. त्यानुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे करीत आहेत.














