
सावंतवाडी : मोरेडोंगरी- सावंतवाही येथील घराच्या अंगणात अवैध गांजा बाळगल्याप्रकरणी अटक संशयीत जावेद पिरसाब शेख वय 38 वर्ष राह. मोरेडोंगरी सावंतवाडी यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब सावंतवाडी यांनी रक्कम रु. 25,000/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे अॅड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.
सावंतवाही पोलिसांनी दि. 12/10/2025 रोजी मोरेडोंगरी-सावंतवाही येथे केलेल्या छाप्याच्या कारवाईत जावेद पिरसाब शेख या संशयीतास त्याच्या राहत्या घराच्या अंगणातून अवैध गांजासहीत अटक करून ताब्यात घेतले होते. त्याच्या विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 (C), 20(b) II(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रमाणे प्राथमिक तपासकाम करून संशयितास मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सावंतवाडी यांचे न्यायालयात हजर करण्यात आले. जप्त गांजासदृष्य पदार्थ कोठून आणला याच्या तपासासाठी अधिक तपासाकरिता पोलिसानी संशयीताची 5 दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली. संशयितांतर्फे केलेल्या युक्तीवादानुसार व आवश्यक रिकव्हरी व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून मे. न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे.