महिला अत्याचार प्रकरण | दुसऱ्या संशयिताला पोलीस कोठडी

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 20:36 PM
views 251  views

सावंतवाडी : परप्रांतीय कामगार महिला अत्याचार प्रकरणातील अत्याचार करणाऱ्या कामगाराला मदत करणारा आरोपी विकेंदर सिंग, वय २५, राह.झारखंड याला सावंतवाडी  पोलिसांच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातून भुसावळ येथून ताब्यात घेऊन आज रोजी न्यायालयात हजर केला असता त्याला २ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

दोन्ही परप्रांतीय आरोपींना पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी पाटील, पोलिस हवालदार प्रवीण वालावलकर,  मंगेश शिंगाडे, गौरव परब यांचे पथकाने ४८ तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.