गोविंद गावडेचा सलग ८ तास २५ मिनिट तबला वाजवण्याचा विक्रम..!

Edited by:
Published on: August 11, 2025 20:07 PM
views 14  views

सिंधुदुर्ग : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कुमार गोविंद बाबुराव गावडे यांनी आज 11 ऑगस्ट रोजी सलग 8 तास 25 मिनिट तबला वाजवण्याचा विक्रम प्रस्थापित केला. 

सकाळी आठ वाजता कार्यक्रमाची सुरुवात आंबोलीचे माजी सरपंच प्रकाश दत्ताराम गवस. यांच्या हस्ते व वृषाली खोत ,लिंगराज गावडे (चंदगड) यांच्या उपस्थित  शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवन, विवेकानंद कॉलेज  येथे करण्यात आली. दिवसभर स्कूलच्या व कॉलेजच्या मुलांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन गोविंदला प्रोत्साहित करत होते. कार्यक्रमाची नोंद ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची रेकॉर्डचे निरीक्षक प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांनी जाहीर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सत्यजित नाना कदम, प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या हस्ते गोविंद गावडेला पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड व ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डची ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक कॉलेजच्या प्राचार्य शुभांगी गावडे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना सत्यजित रूप नाना कदम यांनी गोविंद चा विक्रम हा एक शाहूरायांच्या कलानगरीची ओळख करून देणारा विक्रम असल्याचे आपल्या भाषणात बोलून अभिनंदन केले.

यापुढे त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्या नंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांनी बापूजींच्या आचार विचारात ज्ञान विज्ञान याबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने केले जात असल्याचे संबोधले त्यातूनच गोविंदने आज हा तबला वाजवण्याचा विक्रम करून नवीन इतिहास निर्माण केल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी आंबोलीहून प्रकाश विठ्ठल गावडे (रत्नागिरी आयएस अधिकारी) संजय गावडे (सावंतवाडी तलाठी) पुंडलिक पडवळ.संतोष पालेकर.बाळकृष्ण गावडे व मेनन&मेनेनचे कर्मचारी उपस्थित होते. गोविंद गावडे कुटुंबीयांनी अनाथ आश्रमातून तीन महिन्याचा असताना दत्तक घेतलेला मुलगा आहे. समाजासाठी काहीतरी देणं लागतं ह्या उद्देशाने त्याचे वडील बाबुराव गावडे व आई.सौ. सविता गावडे यांनी एक वेगळ्या पद्धतीने गोविंदची जपणूक  करून त्याला समाजामध्ये एक वेगळे स्थान मिळवून देण्याचा एक प्रयत्न करुन एक नवा संदेश समाजापुढे ठेवला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या सौ.शुभांगी मुरलीधर गावडे यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ.नंदीनी शिंदे सौ . ज्योती गडगे .सौ.पल्लवी हवालदार यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सुपरवायझर असिफ कोतवाल यांनी मानले