
मालवण : सावंतवाडी येथील कळसूलकर स्कुलचे शिक्षक सुमीत बाबू जंगम (५५) यांनी मालवण तालुक्यातील ओवळीये जंगलात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात. आज सकाळी ते शाळेत जाण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र त्यांनी गळफास घेतला. आचरा पोलिस ठाण्यात नोंद असून अधिक तपास पोलीस करत आहेत.