
सावंतवाडी : तालुक्यातील मटक्यासह अवैध धंद्यांवर सावंतवाडी पोलिसांच सुरू असलेलं धाडसत्र सुरूच आहे. काल चार ठिकाणी छापे टाकून सात जणांना गजाआड केल असून रोकड, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही धडक कारवाई पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकानं केली. तालुक्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली. तालुक्यात मटक्यासह कुठलेही अवैध धंदे चालवून घेणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.