
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील सदाशिव अरुण परब (अंदाजे ३३ वर्षे) या तरुणाने काल, बुधवार, २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव परब याने सायंकाळी आपल्या घरात हे टोकाचे पाऊल उचलले. सदाशिवच्या आत्महत्येमुळे सरंबळ गावावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या सदाशिवच्या निधनाने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, सदाशिवने हे पाऊल का उचलले, याचा अधिक तपास सुरू आहे.