
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे-पेडवेवाडी येथे बेकायदेशीररीत्या साठा करून ठेवलेली गोवा बनावटीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी चारुदत्त दाजी गावडे (वय ५५, रा. कारिवडे पेडवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक (मुख्यालय) श्री. माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी आरोपीच्या ताब्यातून ४० हजार ७०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या बिअर आणि व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात. राज्य उत्पादन शुल्क नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.












