
देवगड : देवगड खाक्षी तिठा येथे पोलिसांच्या धाडीत जवळपास ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५२ वा. घडलाखाक्षी तिठा येथील चंद्रकांत गोपाळ घाडीगांवकर यांच्या राहत्या घरी आपसात संगणमत करून एकमेकांना सहाय्य करून स्वतःचे फायदा करिता धन्यवाद रिलेशन क्लब या नावे जुगाराचा अड्डा चालवून जुगार खेळत असताना देवगड पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४०हजार ८०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून १२ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात हेड कॉन्स्टेबल आशिष कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना १३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५२ वा. घडली.या घटनेत रोख रक्कम ५३८०/-, ०९ जप्त मोबाईलची एकूण किंमत रु. ३२,०००/- इतर साहित्य,टेबल, खुर्ची किंमत रु २७००/- एकूण ४००८०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव, हेडकॉन्स्टेबल आशिष कदम यांनी भेट दिली. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत. या घटनेतील संशयित आरोपी चंद्रकांत गोपाळ घाडीगावकर, वय- ६२ वर्षे रा. खाकशी तिठा ता.देवगड, संदीप सखाराम सुर्वे वय-४३ वर्षे रा. किंजवडे सुर्वेवाडी ता देवगड, दर्शन प्रदीप भोवर वय- ३२ वर्षे, रा. जामसंडे विष्णूनगर ता देवगड, शिवाजी भिवा कोळेकर वय ५० रा जामसंडे ता देवगड, उत्तम प्रदीप कोयंडे वय ५० रा जामसंडे कट्टा ता देवगड,दशरथ दयानंद जावकर वय ६९ रा विजयदुर्ग रामेश्वर ता. देवगड, एकनाथ आत्माराम गुरव वय ४७ रा जामसंडे वडांबा ता.देवगड, राजेंद्र वसंत जाधव वय -३५ रा. वाडा ता. देवगड, साई गणेश कांबळी वय ३० वर्ष रा वाडातर ता देवगड, वैभव अशोक खरात वय ३० वर्ष रा. जामसंडे कट्टा ता. देवगड, उमेश अरुण जाधव वय ४० वर्षे रा. वाडा मूलळबांध ता. देवगड, नितीन घनशाम तारकर वय -५७ वर्षे, यांचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ), ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.