सावंतवाडी मटक्यावर पोलिसांची धडक कारवाई

गोव्यातील मटका बुकीवरही गुन्हा दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: September 11, 2025 20:46 PM
views 214  views

सावंतवाडी : ओटवणे देऊळवाडी येथे कल्याण मटका जुगार खेळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज (गुरुवार) दुपारी १२.३० वाजता करण्यात आली. आरोपींकडून ५,९०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सावंतवाडी पोलिस देखील ॲक्टीव्ह मोडवर आलेत. अवैध धंदे वाईकांवर धडक कारवाई करण्याच काम पोलिस यंत्रणा करत आहे. ओटवणे येथील मटका प्रकरणी रमेश लक्ष्मण गावकर (वय ७२) आणि बबलू उर्फ लक्ष्मण रमेश गावकर (दोघेही रा. ओटवणे गवळीवाडी, ता. सावंतवाडी) यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आले. हे दोघे कल्याण मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चौकशीदरम्यान, ते गोव्यातील हरीश गुप्ता नावाच्या व्यक्तीला जुगाराचे आकडे पाठवत असल्याचे समोर आले. त्यामुळे हरीश गुप्ता याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार शिंगाडे आणि शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी दिली.