
कणकवली : डॉ. नागवेकर हॉस्पिटल तोडफोड आणि हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी १० संशयित नावं समोर आली आहेत. याप्रकरणात ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कणकवली पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपीही निश्चित करण्यात येणार आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, कासार्डे येथील युवती कस्तुरी पाताडे हिच्या मृत्युनंतर डॉ. नागवेकर हॉस्पिटलची जमावाकडून रविवारी १४ डिसेंबर रोजी तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. अनंत नागवेकर फिर्यादीनुसार ५० ते ६० जमावाविरुद्ध कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
त्यापैकी संशयित अमोल महादेव राणे (वय ३०), तेजस रवींद्र भांबोरे (वय ३२), नयनेश शशिकांत बंड (वय ४३), भरत भगवान चव्हाण (वय ३८ दारूम), नितीन उर्फ पप्प्या नारायण लाड (वय ५५ कासार्डे), विठोबा कृष्णा माळवदे (वय ४० तळेरे), दर्पण क्षणेश राणे (वय २४ कासार्डे ), सुनील गोविंद साईंम (वय ४० कासार्डे), राठोड गजानन हिरो राठोड (वय ३२ कासार्डे), रमेश चव्हाण (वय ३५ कलमठ) या १० जणांची नावे समोर आली आहेत.














