
सावंतवाडी : इन्सुली येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) हिच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासाच्या मूळापर्यंत जाण्यास बांदा पोलीसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूचे गूढ वाढत आहे. तिचा मृतदेह जिथे सापडला तिथे मिळालेल्या दोन छत्र्या, दोन फुट पाण्यात घराच्या आसपास आढळून आलेला मृतदेह व पहिल्या दिवशी न सापडता दुसऱ्या दिवशी आढळून आलेल्या मोबाईलमुळे यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
या युवतीसोबत घातपात झाला की तिचा दोन फुट पाण्यात बुडून मृत्यू झाला ? याचा तपास होण आवश्यक आहे. ती कंपनीत कामाला गेल्यानंतर घरी परतली नाही. त्यामुळे रात्री उशिरा शोध घेत नापताची तक्रार बांदा पोलिसात दिली होती. मात्र, सकाळी तिचा मृतदेह तिच्या कामावर गेलेल्या ड्रेसवर बॅग लावलेल्या स्थितीत आढळून आला. मात्र, दोन फुट पेक्षा कमी पाण्यात तो आढळून आल्याने याबाबत संशय व्यक्त होता आहे.