
कणकवली : दारूच्या नशेमध्ये आपल्या आईचा खून करणारा संशयित रवींद्र रामचंद्र सोरफ (४५) याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
तालुक्यातील वारगाव सोरफवाडी येथे बुधवार, १० सप्टेंबरच्या रात्री रवींद्र सोरफ याने कोयत्याने डोक्यावर, खांद्यावर वार करून प्रभावती रामचंद्र सोरफ (८०) यांचा खून केला होता. या प्रकरणी रवींद्र याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.