
कणकवली : जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणार असल्याचा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. अर्थात त्याचे महत्त्वपूर्ण पाऊल श्री. राणे यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास उचलले. पालकमंत्री नितेश राणेंनी कणकवली शहरातील घेवारे याच्या गोदामावर दुपारी ४.२० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.
विशेष म्हणजे यावेळी गोदामा मध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने होतेच शिवाय लाखो रुपयांपेक्षा अधिक रुपयांची रोकड आढळून आली. दस्तूर खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका व्यवसायाच्या गोदाम वर धाड टाकल्याचे कळतात खडबडून जागे झालेल्या कणकवली पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीतच सर्व आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी राणे संबंध गोदामाची स्वतः तपासणी केली या सर्वांवर कारवाईच्या करा अशा सूचना राणे यांनी दिल्या.
हे कारवाई सत्र श्री राणे यांचे उपस्थितीत अद्याप सुरू आहे. दस्तूर खुद्द पालकमंत्र्यांनी मटका गोदामावर धाड टाकल्याचे वृत्त समजल्यानंतर कणकवली शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे