
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर रविवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी कणकवली पोलिस ठाण्यात येऊन आरोपींची चौकशी केली. साटम बराच वेळ कणकवली पोलीस ठाण्यामध्ये होत्या. यावेळी त्यांनी पोलिसांशीही चर्चा केली.
पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या रेड नंतर सिंधुदुर्ग पोलीस दलाची नाचक्की झाली होती. या मटका अड्ड्याबद्दल सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम याना दिले होते.त्यानुसार रविवारी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात भेट देत चौकशी केली. यावेळी डीवायएसपी घनश्याम आढाव हेही उपस्थित होते.
कधीपासून मटका अड्डा सुरू आहे, मटका अड्डा कोण चालवतो , यासह अन्य प्रश्नांची सरबत्ती आरोपींवर करण्यात आल्याचे समजते. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडेही चौकशी केल्याचे समजते. दरम्यान चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती देऊ, असे साठवण पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.