जबरी चोरी प्रकरणी मुख्य संशयित गजाआड

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाची कामगिरी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 24, 2025 19:11 PM
views 133  views

कणकवली : फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने देवगड येथे सापळा असून अटक केली. राकेश गणपत वायंगणकर (३६, मूळ कुडी ता. देवगड व सध्या रा. डोंबिवली) असे संशयिताचे नाव असून त्याला कळकवली पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

या कारवाईत एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासमवेत हवालदार राजू जामसंडेकर, आशिष गंगावणे, किरण देसाई आदी सहभागी झाले होते.

ही घटना फोंडा गाडी येथे 30 नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्याने तीन इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गतिमान हालचाली करत घटनेतील तीन संशयीतांच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतूनच राकेश याचे नाव निष्पन्न झाले हे राकेश यानेच संशयतांना लिंग रस यांच्या घराची माहिती दिली होती त्यानुसार एलसीबीच्या पथकाने राकेश याचा शोध घेतला मोबाईल लोकेशन नुसार तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येत होता अखेर त्याला देवगड येथे अटक करण्यात आली.