पाठलाग करत सुगंधी तंबाखू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची कारवाई

तिघे ताब्यात
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 11, 2025 21:00 PM
views 262  views

कुडाळ : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू याची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करणाऱ्या ट्रकची पाठलाग गुरुवारी पहाटे कुडाळ पोलिसांनी करीत‎ ट्रक सह सुगंधित तंबाखूचा माल मिळून सुमारे 1 लाख 72 हजार 58 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू याची वाहतूक केल्याप्रकरणी तसेच हा तंबाखू विक्री करता मागवल्याप्रकरणी सुशील परब (रा.कुडाळ), गजानन चोपडेकर (वय 60) व हेमंत चोपडेकर (वय 29 दोघे राहणार वेंगुर्ला कॅम्प भटवाडी) या तिघा संशयीत्यांवर गुन्हे दाखल केले अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना गोपनीय माहिती मिळाली की कुडाळ येथील सुशील परब यांनी प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला सुगंधी तंबाखू मागविला असल्याची माहिती मिळाली. यामुळे राजेंद्र मगदूम तसेच इतर त्यांच्या पोलीस सहकार्या कार्याने गुरुवारी सकाळी सात वाजता झारा झिरो पॉईंट येथे सापळा रचला. या दरम्याने सदरील तंबाखू वाहतूक करणारा ट्रक कुडाळच्या, दिशेने येताना निदर्शनास आला असता सदरचा ट्रक पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच ट्रकचालकाने, ट्रक न थांबवतात सदरील ट्रक भरधाव वेगात कुडाळच्या दिशेने न्यायला लागला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गाडीने या ट्रकचा पाठलाग सुरू केला. सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास सदरील ट्रक एमआयडीसी तीठा कुडाळ येथे थांबविला. तपासणी केली असता यामध्ये विविध कंपन्यांचे पान मसाला सुगंधित तंबाखू च्या पुड्यांचे बॉक्स, सुगंधी काश्मिरी मसाला पेस्ट, कात पावडर असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे  72 हजार 58 रुपये किमतीचा मुद्देमाल व याप्रकरणी वापरण्यात आलेला. सुमारे एक लाख रुपये किमतीचा ट्रक मिळून एक लाख 72 हजार 58 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात संशयित सुशील परब गजानन चोपडेकर हेमंत चोपडेकर यांचे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बेळगाववरून मागविला माल

सदरील विविध कंपन्यांचा सुगंधित मिश्रित तंबाखू तसेच इतर काच पावडर असे पदार्थ हे सर्व बेळगाव येथून मागविण्यात आले व याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर हा सापळा रचत  ही कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.