
वेंगुर्ले. : वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी तळेकरवाडी येथून मोहिनी महेश टेमकर ( वय 18) ही आज बुधवारी सकाळी 7 वा. पासून घरातून बेपत्ता झाली आहे. ती घरी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली असून अद्यापपर्यंत घरी न परतल्याने तिचे वडील महेश मोहन टेमकर रा. (वा्यंगणी तळेकरवाडी) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात खबर दिली आहे.
त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ता नोंद करण्यात आली आहे. रंग गोरा असून, उंची 5 फूट व तिने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास वेंगुर्ला पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस हवालदार योगेश राऊळ यांनी केले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस दिपा मठकर या अधिक तपास करीत आहेत.














