
कणकवली : डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी विद्याधर प्रभाकर नकाशे (४१, रा. कासार्डे) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना रविवारी रात्री ११.४५ वा. सुमारास घडली.
विद्याधर नकाशे याने रविवारी रात्री दारूच्या नशेत ११२ क्रमांकावर कॉल केला. कासार्डे तिठा येथे ३० ते ४० जण जुगार खेळत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता तेथे कोणीही आढळून आले नाही. तसेच या घटनेची पडताळणी केली असता विद्याधर नकाशे याने दारूच्या नशेत खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून विद्याधर नकाशे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.