
कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर पावशी कुंभारवाडी येथे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली याप्रकरणी अक्षय चंद्रशेखर घाडीगावकर (वय 24 वर्ष )रा. रामगड देऊळवाडी मालवण आणि प्रकाश सुरेश सावंत रा.कणकवली यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत 4लाख 30 हजार 800रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू सहा लाख रुपये किमतीची महिंद्रा झायलो कार असा एकूण दहा लाख तीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयीतांवर दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोसले पोलीस कॉन्स्टेबल कांडर समजीकर यांनी केली.













