
सावंतवाडी : सावंतवाडी परिसरातील खासकिलवाडा आणि माजगाव या दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून आयशर, टाटा टिप्पर आणि अशोक लेलँड यांसारख्या अवजड वाहनांच्या मिळून एकूण सहा बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी खासकिलवाडा आणि माजगाव परिसरात उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केले. या बॅटरी चोरीप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज राऊत हे करत आहेत.