गोवा बनावटीची दारू बाळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 11, 2025 21:13 PM
views 357  views

कुडाळ : विक्री करण्याच्या उद्देशाने गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळविल्या प्रकरणी बिबवणे नाईक वाडी येथील संतोष देऊलकर (वय 35) याचे वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दारू आणण्यासाठी वापरण्यात आलेली मोटार सायकल सह दारू साठा मिळवून 90 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. 

या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र गोसावी यांनी फिर्याद दिली की ते व त्यांच्या विभागाचे अधिकारी व पोलीस कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी दुपारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की बिबवणे येथील संतोष देऊलकर हे त्यांच्या स्वामीका चायनीज सेंटरच्या मागील घरातील पडवीत दारू विक्री व्यवसाय गैर कायदा बिगर परवाना करीत आहेत. 

ही  माहिती मिळताच या पथकाने गुरुवारी दुपारी १:०५ च्या सुमारास घराच्या पाठीमागून चालत जात ते शेडमध्ये गेले असता दोन भरलेल्या पिशवी घेऊन एक व्यक्ती उभा होता सदरील व्यक्तीकडील पिशव्यांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावीटीच्या दारूच्या बाटल्या सापडून आल्या सदरचा हा मुद्देमाल तसेच सदरची दारू गोव्यातून इथपर्यंत आणण्यासाठी वापरण्यात आलेली मोठा सायकल मिळून सुमारे 90 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तसेच याप्रकरणी देऊलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.