
सावंतवाडी : गांजा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्यास स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. जावेद पीरसाब शेख (वय ३८, रा. मोरडोंगरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शेख हा घराशेजारी गांजा विक्री करण्यासाठी थांबलाय, अशी गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक खंदरकर, हवालदार प्रवीण वालावलकर, राऊत आणि मंगेश शिंगाडे यांनी ही कारवाई केली.