'त्या' गावात गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर आणखीन कारवाई

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 31, 2025 20:55 PM
views 200  views

कणकवली : कणकवली तालुक्यात पोलिसांकडून अवैध दारू विक्रीवर धाडसत्र सुरूच आहे. मागील काही दिवसांमध्ये कणकवली पोलिसांनी तालुक्यात विविध ठिकाणी गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर छापा टाकला आहे. 

रविवारी दुपारच्या सुमारास एलसीबीच्या पोलिसांनी नांदगाव येथील ब्रिजखाली गोवा बनवटीच्या दारूविक्रीवर कारवाई केलेली असतानाच रविवारी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास कणकवली पोलिसांनीही नांदगाव - वाशिमवाडी येथे गोवा बनवटीच्या दारू विक्रीवर छापा टाकला. तेथे ३ हजार ८०० रुपयांची दारू जप्त करतानाच संशयित महेश मारुती मोरये (३२, रा. नांदगाव - वाशिमवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चिकणे, हवालदार चंद्रकांत झोरे, पांडूरंग पांढरे, महिला हवालदार स्मिता माने, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव आदी सहभागी झाले होते