
दोडामार्ग : सासोली येथे ओरिजिन आणि द अमूर डेव्हलपर्स कंपनीच्या जमिनीत रस्ता करण्यासाठी बेकायदेशीरपणे जंगल साफसफाई व वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाने जेसीबी आणि डोझर जप्त करून, महाराष्ट्र झाडेतोड अधिनियम १९६४ आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई बाबतची माहिती प्रसिद्धी पत्रक काढत वनखत्याने दिली आहे.
या दिलेल्या निवेदनात म्हटलय की, सुमारे ४ मीटर रुंद व २१५ मीटर लांब रस्त्यासाठी ७४ झाडे मुळासकट उपटल्याचे आढळले. जेसीबी ऑपरेटर आस. कुमार याने हे काम ८ ऑक्टोबरपासून सुरू असल्याबाबत वनाधिकारी यांचे समोर कबुली दिलीय.
ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे व प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्या पथकाने केली.
या कारवाईत झाडोरा मुळासकट काढून टाकल्याप्रकरणी वापराण्यात आलेले जेसीबी पॉकेलंड व डोजर वनखात्याकडून जप्त करून ताब्यात घेण्यात आलय.