कर्करोग झाल्याची भीती ; तरुणाने संपवलं जीवन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 14, 2025 15:42 PM
views 390  views

मालवण : गंभीर आजार झाल्याच्या भीतीने नितीन मुकुंद कोचरेकर (वय - ४३) रा. कोळंब खालचीवाडी या तरुणाने आज पहाटे राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

याबाबतची खबर तुकाराम कोचरेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. कोळंब खालचीवाडी येथील नितीन कोचरेकर याच्या तोंडात फोड आले होते. त्यामुळे त्याला आपल्याला कर्करोग झाला आहे असे वाटले. या भीतीनेच त्याने राहत्या घरी पडवीत नायलॉनच्या दोरीने वाशाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सुशांत पवार यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेत पंचनामा केला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुशांत पवार अधिक तपास करत आहेत.