
कणकवली : नांदगाव येथील ब्रिजखाली सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या विक्री दारूविक्रीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. रविवारी दुपारी १.२५ वा. सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत संशयित अवधूत शामराव वाळके (४४, मुळ रा. करवीर - कोल्हापूर व सध्या रा. असलदे - शिवाजीनगर) याच्यावर तसेच सदर मुद्देमालाचा मालक पप्पू वायंगणकर अशा दोघांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.