
दोडामार्ग : काळ्या दगडाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर महसूल विभागाने पिकुळे येथे कारवाई केली. त्याला एकूण १ लाख ५० हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
पिकुळे येथून एक डंपर काळा दगडाची वाहतूक करत होता. यावेळी तेथे कार्यरत असलेल्या तलाठी स्मिता परब व कोतवाल यांनी तो डंपर तपासणीसाठी थांबविला व चालकाकडे पासची मागणी केली. यावेळी चालकांनी पास नसल्याचे सांगितले. तलाठ्यांनी तो डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डंपर मालकास १ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या कारवाईने अवैध गौण खनिज तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अवैध गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठी तहसीलदार राहुल गुरव यांनी भरारी पथक नेमले आहे. त्यामुळे हे भरारी पथक यापुढे अशीच कारवाई सुरू ठेवणार का? हे मात्र येणारा काळच सांगेल.













