
सावंतवाडी : कोलगाव येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने कार दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
प्रवास करणारे सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ वकील ॲड. बापु गव्हाणकर यांनी जखमींना मदत केली. आपल्या कारन त्यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दारूच्या नशेत चालकाकडून हा प्रकार घडला. संतप्त स्थानिकांनी संबंधित कार जप्त करत पोलिसांना पाचारण केले आहे. या अपघातामुळे. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.













