
दोडामार्ग : नवरात्रौत्सवाच्या धामधूमीचा चोरट्यानी फायदा घेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास दोडामार्ग बाजारपेठेतील दोन वडापावचे गाडे फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत दोडामार्ग पोलिसांनी घटनेची पाहणी करून अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबत मिळालेली माहिती अशिकी नवरात्रौत्सवाची सर्वत्र धामधूम सुरु आहे. दाडिया, गर्भा बघण्यासाठी सर्वजण मग्न्न असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी शहरातील भेडशी मार्गावरील लोकमान्य शाखे जवळील दोन वडापावचे गाडे फोडून रोख रक्कम लंपास केली. यात साईश उद्धव हरमलकर यांच्या गाड्यातील १२ हजारची रोख रक्कम, तर विठ्ठल बापू फाले यांच्या गाड्यातील १६ हजारची रोख रक्कम लंपास करत एकूण २८ हजारांची रोकड लंपास केल्याचे दोन्ही वडापाव चालकांनी सांगितले. तर दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थानची फंड पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो असफल झाला. याघटनेचा दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपल्या टीम सहित पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबबत अधिक तपास सुरु आहे.