
मंडणगड : रा. प. मंडणगड आगारामध्ये भारत पेट्रोलियम, मिरज ऑईल डिपो येथून टँकर क्र. एमएच ९ सीयू-७१२१ हा आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:१० मिनिटांनी दाखल झाला. सदरचा टँकर हा रा. प. प्रचलित नियमानुसार दुपारी सुमारे १३:३० वाजता खाली करून घेण्यात आला. सदरचा टँकर हा पूर्णपणे खाली करून घेतल्यानंतर आगारातील सुरक्षा रक्षक यांनी टँकरवर चढून टँकर पूर्णपणे चेक केला असता सदरचा टँकर हा पूर्णपणे रिकामा झालेला आढळला. परंतु सदरचा १२,००० लिटरचा टँकर हा आगारातील अंडरग्राऊंड टाकीमध्ये उतरवून घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीचे शॉर्टेज हे ३०१ ने वाढल्याने सदरच्या टँकर बाबत शंका आली.
अशा वेळी सदर टँकर पुन्हा चेक केला असता सदर टँकरच्या कम्पार्टमेंट क्र. ०३ व ०४ च्या मध्ये लॉकींग डिव्हाईस जवळ एक स्टील पाईप कॉंक फिरवला होता व कम्पार्टमेंट क्र. ०३ मध्ये डिझेल येत असल्याचे दिसून आले. तसेच कम्पार्टमेंट ३ मध्ये एक छुपा कप्पा केला असल्याचे निदर्शनात आले. तरी चालकाने टँकरमधील डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न करून रा. प. महामंडळाच्या फसवणूक केल्याने सदर प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.
सदरचा टँकर सुरवातीला घेताना अंडरग्राऊंड टाकीची डीप ही ५१.५ होती व त्याचा डिप प्रमाणे डिझेल साठा हा ३९५३ इतका होता. सुमारे १२,००० लिटरचा टँकर उतरवून घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीची डीप ही १४८.० होती व त्याचा डिप प्रमाणे डिझेल साठा हा १५६५२ इतका होता. टँकर उतरवून घेतल्यानंतर अंडरग्राऊंड टाकीचे शॉर्टेज हे ३०१ इतके आढळून आले आहे.