
दोडामार्ग : माटणे वरचीवाडी येथील श्रीकांत धानू गवस यांचे शनिवारी सकाळी 9 वाजता अज्ञात चोरट्यानी घर फोडून दीड लाखाच्या दागिन्यास दहा हजार रोख रक्कम लंपास केली. या घटने बाबत दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.
याबाबत अधिक माहिती अशिकी माटणे वरची वाडी येथील श्रीकांत गवस हे नेहमी प्रमाणे आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळी गेले. व त्यांची पत्नी घर बंद करून आपल्या काजू बागेत गेली. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी घराचे कुलुप फोडले व आतून दाराला खिळी घातली व रूमधील कपात फोडून कपाटातील दोन चेन, दोन अंगठी, कानातील असे साधारण दीड लाखाहून अधिक किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
श्रीकांत यांची पत्नीने गळ्यातील मंगळसूत्र दुसऱ्या ठिकाणी ठेवले असल्याने ते चोरट्याच्या हाती लागले नाही. मिळाले दागिने व रोख रक्कम घेऊन चोरट्यानी पळ काढला. श्रीकांत गवस हे आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी आले असता घराच्या दरवाज्याचे कुलूप फोडल्याचे त्यांना लक्षात आले. यावेळी त्यांनी घराचा दरवाजा ढकलून पाहिला असता दरवाजाला आत मधून खिळी घातल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घराच्या मागच्या बाजूने घरात गेले व घरातील सर्व सामाना कपाटातील सामान अस्थाव्यस्थ पडल्याचे निदर्शनास आले. यावेळी कोणीतरी चोरी केल्याचे त्यांना समजताच त्यांनी या घटनेची दोडामार्ग पोलिसांना कल्पना देऊन तक्रार दाखल केली. या नंतर दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, व पोलीस मळगावकर यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.