
मालवण : कट्टा खालची गुरामवाडी येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील महिलेला ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत झाल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा सुरु होता. मात्र, चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा नातेवाईकांसह ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, याबाबत माहिती भाजपा कट्टा प्रभारी सतीश वाईरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनाही दिली असून सखोल तपास व कारवाई करण्याबाबत पोलिसांना सूचना देण्याबाबत मागणी केली आहे.











